रस्त्याच्या साईडपट्टीवरील उघडे चेंबर ठरेल मृत्यूचे आमंत्रण

0

लोहारा. पाचोरा,लोकशाही  न्यूज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेटच्या नव्या युगात जोडण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन करण्यासाठीचे कंत्राट महाआयटी(महानेट) कंपनीला देण्यात आले होते, त्यानुसार परिसरात अगदी संथ गतीने कंपनीच्या माध्यमातून काम करण्यात आले धोकादायक कामकाजाबाबत अनेक वेळा आवाज उठवण्याचे काम माध्यमांना करावे लागले.

काम पूर्ण झाले पण धोक्याची घंटा तीसुद्धा दाखवावी लागतेय.  त्याचीच परिणीती पुन्हा लोहारा-पाचोरा मार्गावर कन्याशाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पहायला मिळत आहे. या स्थळावर पाचोराकडे जाणाऱ्या वाहनाने समोरुन येणाऱ्या वाहनाला मार्गस्थ करायचे झाले, तर त्या वाहनावरील चालकाचे जराही दुर्लक्ष झाले तर ते वाहन हमखास अपघातग्रस्त होईल.

कामकाज पूर्ण होऊन कालावधी बराच गेला तरी अद्यापपर्यंत कंपनीने किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या तांत्रिक बाबी निवारणासाठी रस्त्याच्या साईडपट्टीवर चेंबर ठेवला.  या चेंबरवर झाकण ठेवले नाही. हा चेंबर त्यांच्या कामासाठी ठेवला असेल तर पब्लिक सुरक्षा म्हणून ते झाकण्याची जबाबदारी कंपनीची नाही काय? वास्तव पाहता कंपनीने रोड लगत साईडपट्टीवर चेंबर ठेवायला नको होता.  कनेक्‍शन असलेला हा गोल चेंबर मोठ्या आकाराचा असून वाहनधारकांसाठी यमदूत ठरणार असे स्पष्ट जाणवत असतानाही कंपनीच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झालेले आहे.  त्यांचा हा सदोष कारभार त्यांना कळला नसावा.

यामुळे कंपनीच्या अधिकारी नरबळी किंवा एखाद्याचा जिव जाईल तेंव्हाच झाकण ठेवतील काय? तेंव्हा येथे अपघात होऊन एखाद कुटुंबीय पोरक झालेल असेल हा साईडपट्टीवर चेंबर कशासाठी ठेवला याची इत्यंभूत माहिती सामान्य नागरिकांना ज्ञात नाही.  हा चेंबर अपघाताला निमंत्रण देणारा असून सुदैवाने येथे अपघात झालेला नाही.  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या चेंबरवर झाकण त्वरित बसवायला हवे.

अपघात झाला तर यात अल्पविचारी सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम करतील तर त्याअगोदर अशा कारभाराविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून अशा संबंधित कंत्राट (ठेकेदार) कंपनीवर यामुळे  बदनामीचा धब्बा होण्याअगोदर कारवाईची भूमिका बजवायलाच हवी. पण गांभिर्य पाहता तुम्हीच सांगा भाऊ  रस्त्याच्या साईडपट्टीवर ठेवलेल्या उघड्या चेंबरने अपघात झाल्याविना राहणार नाही हे सुतोवाच मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.