योगी सरकार आता ”या” शहराचे नाव बदलण्याच्या तयारीत

0

लखनऊ : देशात आजपर्यंत अनेक शहरांची नावे बदलल्यात आली आहेत. त्याचा स्विकारदेखील सर्वांनी केला. याच पार्श्‍वभूमीवर आता उत्तर प्रदेशातील योगी सरकार जगप्रसिद्ध ताजमहाल ज्या शहरात वसलेला आहे त्या शहराचे अर्थात आग्रा शहराचे नाव बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने आग्य्रातील आंबेडकर विद्यापीठातल्या इतिहास विभागातील तज्ज्ञांकडे या शहरासाठी ऐतिहासिक दृष्टीकोनातील नाव सूचवण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. या वृत्तानुसार, योगी सरकार आग्रा शहराचे नाव आग्रवन असे करणार असल्याचे म्हटले जात आहे. आग्रा शहराची पूर्वीची ओळख आग्रवन अशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतिहासतज्ज्ञांना या आग्रवन नावाचे आग्रा हे नाव कधी झाले याची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी योगी सरकारने इलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबाद शहराचे अयोध्या असे केले आहे. तसेच ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचेही नाव बदलून पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्‍शन असे केले आहे. चंदौली जिल्ह्याचेही नाव बदलण्याचा अहवालही सरकारला पाठवण्यात आला आहे. मात्र, यावर अ’द्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.