येडियुरप्पा घेणार आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ?

0

बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली असून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.


नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा आजच घेण्यात यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना केली. आपण राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असून आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ, अशी माहिती येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, येडियुरप्पा हेच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. येडियुरप्पा आज संध्याकाळी ६ वाजता शपथ घेतील.

Leave A Reply

Your email address will not be published.