भुसावळातील हिस्ट्रीशीटर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ :- येथील बाजारपेठ पोलीस रात्रिची गस्त करीत असतांना दत्त नगर वांजोळा रोड भागातील  हद्‍दपार निखील सुरेश राजपुत(वय २६) हा भुसावळ शहरातील नाहाटा चौफुल्‍लीवर आल्याची गुप्त माहीती मिळाल्याने गस्‍त पथकाने तात्काळ तेथे जाऊन  त्यास ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर.पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार,पोहेकाँ रविंद्र साळुखे, पोना.नरेंद्र चौधरी,रमण सुरळकर पोकाँ कृष्णा देशमुख,उमाकांत पाटील,प्रशांत चव्हाण,प्रशांत लाड यांनी केली.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाग६, गुरन ४१३/२०१९ मपोका.कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोना.रमण सुरळकर हे करीत आहे. निखील राजपुत हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याच्‍या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे .तसेच तो भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचा हिस्ट्रीशीटर सुध्दा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.