युवा परिषदेतर्फे सैन्य दलात निवड झालेल्या जवानांसह कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद, चोपडा तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व नवरात्रोत्सवानिमीत्त आयोजित ‘कृतज्ञता सन्मान व सत्कार सोहळा’ या कार्यक्रमाअंतर्गत चोपडा तालुक्यातील भारतीय सैन्य दलात निवड झालेले जवान व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात युवकांचे प्रेरणास्थान शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपड्याच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ९ कर्तृत्ववान महिलांचा आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यात प्राचार्य योगिता पाटील-बोरसे (कवयित्री/गझलकार), चंद्रकला चव्हाण (आरोग्यसेविका, अडावद), रत्ना बडगुजर (होमगार्ड, चोपडा), कल्याणी पाटील (ग्रामसेविका), रेखा पवार (स्वच्छता कर्मचारी, न.पा), संगिता कोळी (आशा स्वयंसेविका, तांदलवाडी), अनिता पाटील (क्रिडा शिक्षिका, चहार्डी), अर्चना गुजराथी (उद्योजिका, चोपडा), हर्षदा भुषण कोळी (सामाजिक कार्यकर्त्या, चहार्डी) आदींचा समावेश होता. तर, भारत भूमीच्या सेवेसाठी निवड झालेले सैनिक त्यात किरण पाटील (वर्डी), अथर्व कुलकर्णी (आडगाव), मनिष थोरात (चोपडा), अतुल पाटील (काजीपुरा), राहुल धनगर (चोपडा), सावता माळी (आडगाव) यांचा फेटा बांधून व सन्मानपत्र प्रदान करून पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून व्याख्याते प्रा. संदीप बी. पाटील, शारदा क्लासेसचे संचालक गौरव महाले, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्या मंगलाताई कैलास पाटील, रोहीणीताई प्रकाश पाटील आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते संघ लोक सेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत १८२ गुणानुक्रमाणे उत्तीर्ण गौरव रविंद्र साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्रा.संदीप पाटील व गौरव महाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, सत्कारार्थींमधून प्रातिनिधिक स्वरूपात गौरव साळुंखे, प्रा.योगिता पाटील-बोरसे, रत्ना बडगुजर, अनिता पाटील यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बडगुजर क्लासेसचे संचालक प्रा. किरण बडगुजर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा समन्वयक मयूर पाटील, अश्विनी पाटील यांच्यासह चोपडा तालूका पदाधिकारी समाधान सोनवणे, शैलेश धनगर, दीपक भालेराव, सनी पाटील, वैष्णवी सोनवणे, जयेश सनेर, परेश पवार, तन्मय अहिरराव, निलेश भिल्ल, दीपिका निकम, कुलभूषण दोडे, कुणाल सोनवणे, किरण चौधरी, नम्रता अग्रवाल, समाधान कोळी यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष दीपक भालेराव यांनी केले तर तालूका महासचिव कुलभूषण दोडे यांनी आभार मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.