‘युनिक इन फ्युजन’ प्रदर्शनात चाळीस विद्यार्थ्यांचा सहभाग

0

जळगाव ः येथील स्वातंत्र चौकातील ब्लिंग व आयआयडीडी संस्थेतील चाळीस विद्यार्थ्यांनी कलाकृती साकार करीत ‘युनिक इन फ्युजन’ या प्रदर्शनात सहभाग घेतला. शनिवार दि. 22 व रविवार 23 रोजी हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी सुरु राहणार आहे.

फॅशन व इंटेरियर डिझायनिंगचे व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या कलाकृती तयार केल्या आहेत. त्यात फॅशनच्या विद्यार्थ्यांनी डिझायनर गारमेंट, ऍम्ब्राडरी तर इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी पेपर कार्ड बोर्ड व रिसायकल वस्तूंचा वापर करीत कलाकृती तयार केलेल्या आहेत. लाईव्ह मॉडेल प्रदर्शनाचे आकर्षण आहे.

रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व रोटरॉक्टचे डी.आर.आर शंतनू अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संचालिका राधिका शर्मा, दीपा कक्कड, दिया मंगवानी यांची विशेष उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्रा. रचना मंत्री, प्रा.गौरी धनमेहर, प्रा.संजना मल्हारा, प्रा.सागर वलभानी व विद्यार्थी परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.