वराडसिममधून युवती बेपत्ता

0

भुसावळ (प्रतिनिधी )-

साडीला टिकल्या लावण्याकरीता साडी आणण्यासाठी घरबाहेर गेलेली 18 वर्षिय तरुणी घरी परतलीच नसल्याची घटना  तालुक्यातील वराडसिम येथे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी घडली .

या बाबत मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन हरविल्याची नोंद करण्यात आली आहे .18 वर्षीय. रंगाने सावळी ,अंगात गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता , शरीर सडपातळ असे वर्णन असलेली मुलगी सापडल्यास तालुका पोलिसांना संपर्क साधावा असे तालुका पोलिसांनी कळविले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.