यावल येथे वाळू तस्करांची पोलीस पाटलासह कुटुंबाला मारहाण

0

यावल 

तालुक्यातील सावखेडा सीम येथील पोलीस पाटलासह त्यांच्या कुटुंबाला वाळू तस्करांनी मारहाण करून धमकावले आहे. ”आमचे वाळूचे ट्रॅक्टर तहसीलदारांना सांगून पकडायला का लावतो ?” या कारणावरून ही  घटना घडली आहे.

याबाबतीत  पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील पंकज बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील, विकास पंडीत पाटील, विजय विकास पाटील, चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून त्यांना मारहाण केली.

तसेच  ‘तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडयाला लावतो’ असे बोलुन तु पोलीस कसा राहतो असे बोलुन व शिवीगाळ करीत संशयीत आरोपी यांनी पोलीस पाटील यांना खाटेच्या दांडाने मारहाण केली. या वेळेस पंकज बडगुजर यांच्या भाऊची पत्नी पुनम जीवन बडगुजर व भाऊ जिवन दयाराम बडगुजर आणि राहुल जिवन बडगुजर यांना ही लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत करण्यात आली.

याबाबत पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर (वय ३५, रा.  सावखेडा सिम) यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केल्या असुन भाग ५ गु.र.न.११६ / २०२१ भादवी कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.