मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

मुक्ताईनगर 

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड आधार लिंकिंग व इतर जिल्ह्यात आधार लिंक झालेली नावे याबाबत दुरुस्तीची कामे तातडीने होत नसून पुरवठा विभाग ऑनलाईन होत नसल्याचे कारण व  सदरील वेबसाईट बंद किंवा सर्वर जाम असल्याचे कारण देवून तर कधी तहसीलदारांचे थंब होत नसल्याची कारणे करून नागरिकांचे रेशन कार्ड संबंधी कामे प्रलंबित ठेवत आहेत. की यामागे काही आर्थिक उद्देश पुरवठा विभागाचा असेल ? अशा एक ना अनेक कारणांनी रेशन कार्ड बाबतीत प्रश्न कायमच प्रलंबित ठेवण्यात येत असतात .

नागरिकांना अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब,  केशरी कार्ड धान्यापासून वंचित राहावे लागते.  तसेच  इतर योजनापासून लांब ठेवण्याचा संतापजनक प्रकार येथे सुरू असल्याने याप्रकरणी तात्काळ योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येवून नागरिकांचे रेशन कार्ड बाबतीत सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात.  अन्यथा शिवसेनेतर्फे प्रचंड आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे तहसिलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले . सदर  निवेदन नायब तहसिलदार श्री.पानपाटील यांनी स्वीकारले.

यावेळी  शहर प्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक  वसंत भलभले,  युवा सेना तालुका प्रमुख पंकज राणे,  शकुर जमदार, जाफर अली, हारून शेख ,  नगरसेवक मुकेश वानखेडे, आरिफ आझाद, सलीम खान, लीलाधर पाटील, कैलास बावणे, पप्पु मराठे, शुभम शर्मा आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.