…म्हणून ऑस्ट्रेलिया 10 हजार उंटांना ठार करणार

0

सिडनी : – ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे लाखो प्राणी, पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाचीही झळ सोसत असलेल्या ऑस्ट्रेलियावर 10 हजार उंटांची हत्या करण्याची वेळ आली आहे. येत्या पाच दिवसांत हेलिकॉप्टरमधून शार्पशूटर उंटांच्या कळपांना ठार करणार आहे.

ऑस्ट्रेलियात भीषण आगीसह तेथे पाणी समस्याही गंभीर बनलीय. त्यामुळे, जास्त पाणी पितात म्हणून दक्षिण ऑस्ट्रेलियात 10 हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात येत आहे. एका इंग्रजी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत आहेत, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती.

दक्षिण ऑस्ट्रेलियात पाण्याची गंभीर समस्या असून जंगलातून उंट मानवी वस्तीत येत. त्यामुळे, नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत संबंधित विभागाने व्यावसायिक शुटर्संना उंटांना गोळा घालण्याचे आदेश दिले. या शुटर्संनी हॅलिकॉपटरमधून गोळ्या घालत 10 हजारहून अधिक उंटांना ठार करण्याचं मिशन ठेवलं आहे. एकीकडे तिथेत प्राण्यांना वाचविण्यासाठी ऑस्ट्रेलियन जीवाचं रान करत आहेत. त्यातच, अशातच मानव स्वत:च्या हाताने उंटांना संपवत असल्याने संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

उंट हे ऑस्ट्रेलियातले मूळ प्राणी नाही. 1840 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात उंट आले. या काळात अनेक धाडसी खलाश्‍यांनी जगाच्या पाठीवरील अनेक देशांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 1840 नंतर पुढच्या 60 वर्षांत 20 हजार उंटांची भारतातून ऑस्ट्रेलियात आयात करण्यात आल्याची नोंद सापडते. आताची परिस्थिती पाहिली तर सर्वाधिक जंगली उंटाची संख्या ही ऑस्ट्रेलियात आढळते. हे जंगली उंट पाण्याचे स्त्रोत तसेच स्थानिक रोपटी, फुलांच्या प्राजातींनाही मोठे नुकसान पोहचवतात अशी स्थानिकांची तक्रार आहेत. या सर्वांमुळे 10 हजार उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी पाड्यांपासून दूर नेऊन त्यांची हत्या केली जाणार आहे. त्यानंतर काही काळांनी त्यांचे मृतदेह जाळून टाकण्यात येणार आहेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.