जन्मदात्या पित्याने केली ७ वर्षीय मुलीची हत्त्या, पत्नीला फोन करून दिली हत्त्येची माहिती

0

जळगाव । जन्मदात्या बापाने एका सात वर्षीय मुलीची हत्त्या करून मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी गिरणा नदीच्या पात्राच्या किनाऱ्याजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. कोमल संदीप चौधरी असे मयत मुलीचे नाव आहे. तर संदीप चौधरी (रा. निमखेडी शिवार) असे आरोपी पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या वडिलाला पारोळा येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

निमखेडी शिवारात संदीप चौधरी हा वास्तव्यास आहे. दरम्यान, आज त्याने आपल्या एका सात वर्षीय मुलीची हत्त्या करून मृतदेह गिरणा नदीच्या पात्राच्या किनाऱ्याजवळ फेकून दिला. पत्नीला फोन करत मुलीची हत्या केल्याची माहिती संदीपने दिली. स्वत: आत्महत्या करणार असल्याचेही संदीपने पत्नीला सांगितले. मात्र त्याला पोलिसांनी पारोळा येथून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलाभ रोहम, भाग्यश्री नवटक्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निर्क्षक बापू रोहम यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.