मोठी बातमी.. रेल्वे बुकिंग सेवा पाच तास बंद राहणार; वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय रेल्वे एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही रेल्वेने प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा कुठे जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण तुमच्यापुढे ही समस्या निर्माण होऊ शकते.

रेल्वेचे आरक्षण करायला गेला तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कारण पूर्व रेल्वेची प्रवासी आरक्षण व्यवस्था काही काळ बंद राहणार आहे. पूर्व रेल्वेने ट्विट करताना म्हटले आहे की, प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) 23 ऑक्टोबर रोजी रात्री 23.45 ते 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.00 वाजेपर्यंत  काम करणार नाही.

रेल्वेने ट्विट केले

पूर्व रेल्वेच्या ट्विटनुसार, कोलकाताच्या पीआरएस डेटा सेंटरमध्ये देखभाल उपक्रमामुळे तिकीट निर्मिती होणार नाही. हे काम 23 ऑक्टोबर रोजी रात्री 23.45 ते 24 ऑक्टोबर पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुक करावे, अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिस्टम येथे बंद राहणार

पूर्व रेल्वेने सांगितले आहे की देखभाल उपक्रमादरम्यान, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व कोस्ट रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, ईशान्य सीमावर्ती रेल्वे आणि पूर्व सर्व सेवा इंटरनेट बुकिंग, चौकशीसह अनेक सेवा बंद राहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम यासह ईशान्य राज्यांमध्ये, या रेल्वे विभागाअंतर्गत येणारी राज्ये, रेल्वे तिकिटांची ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन रिटायरिंग रूम, चौकशी इ. सेवा उपलब्ध होणार नाहीत, याची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.