मोठी बातमी : मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेची माघार, ट्विट करत म्हणाली

0

मुंबई :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असताना भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरी, जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणु शर्माविरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आश्‍चर्यकारक कलाटणी मिळाली आहे.  यानंतर एक मोठी अपडेट आली असून तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे.

रेणू शर्मा यांनी ट्विट करत आपण तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असं म्हटलं आहे. “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते,” असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी

मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.