स्वयंस्पष्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे सादर करा

0

चिखली – शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रा. पं.सचिवांना पाठीशी घालत असल्याने जाधव साहेब गटविकास अधिकारी चिखली यांची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली होती,

चिखली तालुक्यातील पंचवीस ग्रा. पं.नी कोरोना साहित्य खरेदीत गैर व्यवहार केल्याच्या वारंवार  तक्रारी गटविकास अधिकारी पं. स.चिखली यांच्याकडे ग्रामस्थांनी व  शेतकरी संघर्ष समितीद्वारे करण्यात आलेल्या असतांना देखील गट विकास अधिकारी जाधव यांनी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याने व कोरोना साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संघर्ष समितीद्वारे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली असल्याने त्या अनुषंगाने

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडून सदर प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ कार्यवाही करण्यात यावे असे आदेश जारी केले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पं. स. गटविकास अधिकारी यांना सदर विषयांकित प्रकरणी प्रशांत ढोरे पाटील शेतकरी संघर्ष समिती चिखली यांची तक्रार संदर्भीय विषया नुसार कार्यालयात प्राप्त झालेली असून सदर तक्रारींचे तात्काळ अवलोकन व्हावे व संदर्भीय तक्रार अर्जामध्ये नमुद मुद्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन केलेल्या कार्यवाही बाबतचे प्रशांत ढोरे पाटील यांना पंचायत समिती स्तरावरून कळवण्यात यावे तसेच आपला स्वयंस्पष्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे व  जिल्हा परिषद कार्यालयात सात दिवसाच्या आत सादर करावा ,सदर प्रकरणी विलंब झाल्यास भविष्यात उद्धभवणार्या पेच प्रसंगास पंचायत समिती कार्यालय चिखली पूर्णपणे जबाबदार असेल अश्या आशयाचे पत्र पं. स. गटविकास अधिकारी चिखली यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.