मेस्टाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पंडितराव शिंदे

0

पाचोरा –   येथील गिरणाई  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन पंडितराव परशराम शिंदे यांची महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनच्या (मेस्टाच्या) जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी जळगाव येथे मेस्टाच्या जळगाव येथील झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष  इंजि. नरेश चौधरी  यांनी ही निवड जाहीर केली. या प्रसंगी मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या हस्ते पंडितराव शिंदे यांना  मेस्टाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र देण्यात आले. जळगाव येथील हॉटेल के. पी. प्राइडच्या सभागृहात ही सभा संपन्न झाली.

याप्रसंगी मेस्टाचे प्रदेश प्रतिनिधी कांतीलाल पाटील (चोपडा) महिला जिल्हाध्यक्ष विद्या पाटील (इम्पिरील स्कूल, जळगाव), प्रदेश प्रसिद्धीप्रमुख सचिन मलिक, टीचर ट्रेनर निलेश त्रिभुवन, गिरगाई शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रा. शिवाजी शिंदे व जिल्ह्यातील बहुसंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संस्थाचालक तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

जळगाव येथे झालेल्या  मेस्टाच्या सभेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवताना येणाऱ्या अडचणी व समस्या यांच्यावर विचार विनिमय करण्यात आला. याबाबत राज्यभरातील समस्या विचारात घेऊन मेस्टाच्या औरंगाबाद येथील अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे मे.स्टा.चे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी सांगितले. यावेळी मेस्टाच्या जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट संघटन बद्दल तायडे, पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नरेश चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.