गो. से.हायस्कूल किमान कौशल्य विभागाची औरंगाबाद येथे “महाराष्ट्र एक्सप्रो – २०२०”औद्योगिक प्रदर्शनास भेट.

0

पाचोरा – पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा, जि. जळगाव (एच.एस.सी. व्हॅकेश्नल डिपार्टमेंट) इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी “औरंगाबाद” येथे “महाराष्ट्र एक्स्पो-२०२०”  औद्योगीक प्रदर्शनास भेट दिली.

४५० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी उपकरणाची माहिती प्रात्यक्षिक सह जाणून घेतली. संस्थचे अध्यक्ष दिलीप वाघ, संस्थचे चेअरमन संजय वाघ, संस्थेचे सेक्रेटरी महेश देशमुख, संस्थचे व्हाईस चेअरमन विलास जोशी, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, प्राचार्य एस. डी. पाटील यांनी  प्रदर्शनास जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रदर्शनाची भेट यशस्वी होण्यासाठी प्रा. मनिष बाविस्कर, प्रा.दिनेश पाटील, प्रा.शरद माथूरवश्य  यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.