भडगावात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनजागृतीपर शिबिराचे आयोजन

0

भडगाव – तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त  विद्यमानाने दि.13 युवा दिनानिमित्त सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन  करण्यात आले.  सदरील शिबीराचा प्रारंभ राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.

सदरील शिबिरात  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  भडगाव वकील संघाचे सचिव ॲड.निलेश तिवारी यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी या विषयावर तर भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी  रहदारीचे नियम या विषयांवर  महाविद्यालयातील उपस्थित युवक आणि युवतींना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भडगाव न्यायालयाचे सह न्यायाधीश श्री आय.जे. ठाकरे यांनी भूषवले.

युवकांनी जिद्द व चिकाटी अंगी बाळगल्यास कोणतीही गोष्ट असाध्य नाही त्यामुळे युवकांनी जीवनाचा महत्त्वाचा काळ कोणत्याही वायफळ गोष्टीत वाया न घालवता ध्येय निश्चिती कडे व्यतीत करावा असे आवाहन न्यायाधीश महोदयांनी उपस्थित युवक-युवतींना समारोपीय भाषणात केले.

सदरील कार्यक्रमास भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. महाजन, उपाध्यक्ष ॲड. के. व्ही. पवार, ॲड.एम. बी.पाटील, ॲड. के. टी.पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, व्याख्याता तांदळे सर, भैसे सर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयीन कर्मचारी श्री.बी.जी.नाईक यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. भैसे सर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.