मृद आणि जलसंधारण मंत्रालयाच्या महामंडळा अंतर्गत 13 कोटी 42 लाख रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर

0

अमळनेर प्रतिनिधी : मतदारसंघातील विविध नद्या नाले यांच्यावर छोटे सिमेंट बंधारे तयार करून त्या त्या परिसरातील सिंचन पातळी वाढावी व विहिरींना पाणी वाढावे या दृष्टिकोनातून आमदार अनिल पाटील यांनी तब्बल 20 बंधाऱ्यांसाठी पाठपुरावा केला त्यात मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंजुरी दिली असून 20 बंधाऱ्यांना मंजुरी प्राप्त झाली आहे.

अनेक वर्षांपासून अमळनेर मतदारसंघ हा अवर्षणप्रवण भाग असून मागे तब्बल 4 वर्ष येथील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागला मतदारसंघात अनेक छोटे मोठे नाले आहेत यांच्यातील पाणी पावसाळ्यात वाहून नद्यांना मिळते मात्र या भागात सिमेंट बांध अत्यंत तुरळक आहेत. ते देखील तुटक्या फुटक्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नद्या वगळता बाकी गावांना दुष्काळ पाणी टंचाईचा या बाबींचा सामना करावा लागतो. अनेक गावांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवते पर्याय म्हणून विहिरी अधिग्रहण करणे टँकर पुरवणे आदी कामे करावी लागतात यंदा मे मध्ये पाणी टंचाई सुरू झाली तरी दरवर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये टंचाई सुरू होते. ही शोकांतिका आहे.

यासाठी मतदारसंघातील विविध कार्यकर्ते सरपंच यांच्याशी चर्चा करून विविध गावांना बांध कसे घालता येतील यासाठी आधी सर्व्हे करून त्यानुसार हे बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यानंतर ते करून मृद व जलसंधारण मंत्रालयात जाऊन मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कानावर ही बाब टाकली त्यांनी लगेच कार्यवाही करत यास मंजुरी दिली असून औरंगाबाद दौऱ्यावर मंत्री गडाख असतांना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्देश दिले व ती यादी मंजूर केली   लवकरच या कामांना गती मिळणार असून यामुळे मतदारसंघातील गावांना याचा फायदा होणार आहे. याबाबत मंजुरी मिळालेल्या गावातील गावकऱ्यांनी आमदार अनिल  पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यादी व निधी रक्कम पुढीलप्रमाणे

शहापुर – बेटावद बंधारा   14015373, शिरसोदे 1- 13090085, शिरसोदे 2- 10698754, आंबापिंप्री 1- 3157690, आंबापिंप्री 2- 4036288, आंबापिंप्री 3-  4235153, आंबापिंप्री 4-  4700999, आंबापिंप्री 5- 4764721, सबगव्हाण ता.पारोळा 1- 3571065, सबगव्हाण ता.पारोळा 2- 2038816, शेळावे बु 1- 5441532, शेळावे बु-2- 4830059, इंधवे 1- 7127014, इंधवे 2- 5242419, बहादरपूर- 3510785, धाबे- 4699061, भिलाली- 13347988, फाफोरे खु- 13153180, कुर्हे बु.- 6288126, रामेश्वर- 6100292.

 

एकुण रक्कम-134249400 /-

Leave A Reply

Your email address will not be published.