महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पदी अलीम देशमुख

0

पाळधी ता,धरणगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी पाळधी येथील दैनिक  देशदूत चे जेष्ठ पत्रकार अलीम (संजू भैया) देशमुख यांची नियुक्ती  करण्यात आली.

सदर नियुक्ती पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार सचिन सोमवंशी, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन उपस्थित होते.

देशमुख यांची मराठी पत्रकार संघात निवड झाल्याबद्दल पाळधी येथील पत्रकार संघातर्फे   शुभेच्छा देण्यात आल्या पाळधी येथील जेष्ट पत्रकार महेश झवर,भगवान मराठे, मुन्न झवर ,महेंद्र चौधरी ,दिपक झवर  सभापती मुकुंद नंन्नवरे ,गोपाळ सोनवने ,महेश मोरे, दिपक साबळे तसेच धरणगाव तालुक्यातील पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.