मु. जे. महाविद्यालयात डॉ. जी. डी. बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्याच्या युगात सॉफ्टवेअर हा अविभाज्य घटक बनलेला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचा “इम्पॅक्ट -२०२३” हा एक प्रयत्न आहे. त्यानिमित्त मु. जे. महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातर्फे कै. डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. जी. डी. बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धा व पोस्टर सादरीकरण इम्पॅक्ट -२०२३” आयोजित करण्यात आले आहे.

स्पर्धेचे हे यशस्वी १३ वे वर्ष आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आतापर्यंत झीप इट अप,वेब क्राउलर, सिनरी डिटेक्शन फॉर ब्लाइंड, मी आय हेल्प यू ?, ब्रेन शार्पनर, स्नेक डिटेक्टर अशा प्रकारचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक सॉफ्टवेअर सादर करण्यात आले होते. या वर्षी सॉफ्टवेअरसह पोस्टर्स सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा सर्व विद्या शाखांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी पदवी व पदव्युत्तर असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके असणार आहेत.

फिरता चषक :- सहभागी झालेल्या महाविद्यालयातील एकूण स्पर्धकांची संख्या परफॉर्मन्स, विजेत्यांची संख्या, व सादरीकरण या बाबींचा एकत्रित विचार करून फिरत्या चषकाचा विजेता ठरविण्यात येईल. मागील वर्षाचा

( इम्पॅक्ट २०२१ ) फिरता चषक डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण यांनी पटकाविला होता.

उद्घाटन :- २८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता.

परीक्षक :- या स्पर्धेसाठी संगणक क्षेत्रातील विविध प्रख्यात मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

पारितोषिक वितरण : – दि २८ मार्च २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.