मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिसच्या स्वयंसेवकांनी यावल, रावेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा केला सर्वे

0

फैजपूर-  मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर (एमपीजे) तर्फे संपूर्ण राज्यात २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत राईट टू हेल्थ उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत यावल, रावेर तालुक्यातील न्हावी,हिंगोणा, खिरोदा, फैजपूर या गावांमध्ये जाऊन मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर (एमपीजे) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,ग्रामिण रुग्णालय व नगरपरिषद रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची संख्या, उपलब्ध साहित्य,औषधी या सर्व गोष्टींची माहिती घेतली.यावेळी एमपीजे जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद, जिल्हा सल्लागार आर बी चौधरी, फैजपूर शाखेचे स्थानिक कार्यकर्ते रहिमोद्दीन, इक्बाल खान, मोहम्मद इलियास,अर्शद उल्ला, शेख मुस्तकीम इ.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्व्हेक्षणात ज्या आरोग्य केंद्रात कर्मचारी, सुविधा,औषधी व आवश्यक साहित्य यांची कमतरता आहे त्याविषयी वरीष्ठ पातळीवर सविस्तर माहिती देऊन या समस्या सोडविण्यासाठी मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस वेल्फेअर प्रयत्न करणार आहे असे जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.