जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

जळगाव – २७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय अवयवदान म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो त्यानिमित्त छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन , सुखकर्ता फाउंडेशन आणि आनंद डायलेसिस सेंटर जळगाव आणि आर्या फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कक्षात आयोजित कार्यक्रमात अवयवदान चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले !

त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आणि  नीलिमा अहिरराव आणि  सौ विमल जोशी ह्या किडनी दात्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले !आपल्या शरीरातील अवयव जिवंतपणी दान करून कुटुंबातील  प्रिय व्यक्तीला पुर्नजन्म देणाऱ्या ह्या दोघी महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे  मतजिल्हाधिकारी ह्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केले !

महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या “अवयवदान  प्रतीज्ञा

प्रतिमेचे  विमोचन ह्या विशेष दिनाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या  हस्ते करण्यात आले !

सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी सर्व शासकीय कार्यालयात ह्या प्रतिमा आगामी काळात लावणार असल्याचा मनोदय व्यक्त केला !

छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन चे किशोर सूर्यवंशी व आनंद डायलेसिस सेंटरचे डॉ अमित भंगाळे , आर्या फाउंडेशन चे डॉ धर्मेंद्र पाटील ह्यांनी अवयवदान मोहिमेस  गती येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

यावेळी श्री . मुसा शेख , छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन ह्यांनी  आभार मानले !

Leave A Reply

Your email address will not be published.