मुंबईत मुसळधार : अनेक रेल्वेगाड्या रद्द

0

भुसावळ- मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्‍याने मध्य रेल्वेतर्फे काही एक्सप्रेस गाड्‍या रद्द करण्‍यात आल्‍या आहे.  यात भुसावळ  विभागातून धावणाऱ्या गाड़ी क्र.०२००९  डाऊन  लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपुर  एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकाहुन ९ ऑगस्ट रोजी रद्द करण्‍यात आली असुन ती दि.१० ऑगस्ट रोजी येणार नाही.

गाड़ी क्र.०२०१०  अप  गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनल्स  एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकावरुन दि.१० रोजी रद्द करण्‍यात आली आहे.

गाड़ी क्र.११०८३ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल्स काजीपेट  एक्सप्रेस  प्रारंभिक स्थानकाने दि.९ ऑगस्ट रोजी रद्द राहील.

गाड़ी क्र.११०८४ अप  काजीपेट लोकमान्य टिळक टर्मिनल्स  एक्सप्रेस  प्रारंभिक स्थानकाने दि. रोजी रद्द करण्‍यात आली आहे.

गाडी क्र.११०२६ डाऊन पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकावर दि.९ ते ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र.११०२५ अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकावरून दि.९ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.