अमळनेर तालुक्यातील मुडी गावात शिरले पांझरेचे पाणी

0

नागरिकांचे जि.प. शाळेत स्थलांतर

अमळनेर | पांझरा नदीपात्रातून सध्या 49 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मुडी गावात पाणी शिरले आहे. गावातील एक हजार नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर केले आहे. या नागरिकांना अमळनेर येथील मंगळग्रह देवस्थानच्या मदतीने खिचडीचे वाटप करण्यात आले आहे. याठिकाणी एक होडी उपलब्ध करून देण्यातआली आहे.

अक्कलपाडा धरण क्षेत्रात रात्री पावसाचा वेग वाढल्यास पांझरा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यास अमळनेर तालुक्यातील नदी काठावरील मांडळ व 7 गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.