मुंबईत ‘गेट वे’जवळ समुद्रात पर्यटक बोट बुडाली !

0

मुंबई : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळील समुद्रात रविवारी संध्याकाळी मोठी बोट बुडाली. पर्यटक बोटीवर वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु असताना ही बोट अचानक बुडू लागली. यावेळी बोटीत 50 जण होते. मात्र सुदैवाने या बोटीवरील 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

बोट बुडत असल्याचं लक्षात येताच उपस्थित मच्छिमारांनी बोटीवरील 50 जणांना मोठ्या धाडसाने वाचवलं. गेट वे ऑफ इंडियाजवळ हा सुटकेचा थरार सुरु होता, मात्र पोलीस, तटरक्षक दल या घटनेबाबत अनभिज्ञ होते. बोटीत पाणी येत असल्याने पर्यटक घाबरले. पर्यटकांनी आरडाओरड केल्याने गेट वे जवळच्या अन्य बोटींना या दुर्घटनेची माहिती समजली. काही पर्यटकांनी उड्या मारुन जीव वाचवला. तर स्थानिक कोळ्यांनी पर्यटकांची सुटका केली. या बोटीला परवानही होती का याची चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.