पाचोरा येथे देरानी, जेठानीचा एकाच दिवशी मृत्यू

0

– वर्मा कुटुंबियांवर पसरली शोककळा

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील दामजी नगर येथील रहिवासी असलेल्या सुनिता विजयकुमार वर्मा (देरानी) वय – ५२ वर्ष यांचे आज  दि. ७ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. तर इंदिरा नगर, पाचोरा येथील रहिवासी असलेल्या नंदा किशोरकुमार वर्मा (जेठानी) वय – ५२ वर्ष यांचे कर्करोगाच्या आजाराशी झुंज देत असतांना पहाटे ५ वाजता राहते घरी निधन झाले. समवयस्क असलेल्या देरानी – जेठानीचे एकाच दिवशी दोन तासांच्या अतंराने निधन झाल्याने येथील प्रतिष्ठित असलेल्या वर्मा कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुनिता विजयकुमार वर्मा यांचे माहेर भगुर जि. नाशिक येथील असुन त्यांचे पाश्र्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्या पिंपळगाव (हरे.) येथील महाविर ज्वेलर्सचे संचालक विजयकुमार गोरखनाथ वर्मा यांच्या पत्नी होत. तर जेठानी नंदा किशोरकुमार वर्मा यांचे पहाटे ५ वाजेच्या दरम्यान राहते घरी निधन झाले असुन त्यांचे माहेर अमरावती येथील आहे. त्यांचे पाश्र्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्या वर्मा डिश केबलचे संचालक किशोरकुमार गोरखनाथ वर्मा यांच्या पत्नी होत. सौ. नंदा वर्मा व सौ. सुनिता वर्मा यांचे योगा योगाने ५२ वर्ष वय दोघांनाही दोन मुली व एक मुलगा यातही साम्य, एकाच घरातील सख्ख्या देरानी – जेठानीचे एकाच दिवशी केवळ दोन तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुनिता वर्मा यांचा मृतदेह औरंगाबाद येथील आणल्यानंतर दामजी नगर येथुन ट्रॅक्टरवर आणुन इंदिरा नगर येथे आणण्यात आला. व त्यानंतर त्याच ट्रॅक्टरमध्ये नंदा वर्मा यांचाही मृतदेह ठेवुन बाहेरपुरा येथील स्मशानभुमीत नेल्यानंतर दि. ७ रोजी दुपारी तीन वाजता एकाच ठिकाणी देरानी – जेठानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उसळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.