मी मास्क घालतच नाही…तुम्हालाही सांगतो ; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चा

0

मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमकी उलटी भूमिका घेतली आहे. राज ठाकरे मास्क न घालताच आज मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं चर्चा रंगली आहे.

 

‘मनसेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारमधले मंत्री गर्दी करून धुडगूस घालतात, ते चालते. पण, शिवजयंती आणि मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना नकार दिला जातो. एवढी काळजी वाटत असेल तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढं ढकला. एका वर्षाने घ्या. काही फरक पडत नाही,’ असं त्यांनी सुनावलं.

Leave A Reply

Your email address will not be published.