मिलिंद एकबोटे अखेर पोलिसांसमोर हजर

0

पुणे :

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे अखेर आज सकाळी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाखले गेल्या काही तासांपासून त्यांची चौकशी करत आहेत.

मिलिंद एकबोटे आज सकाळी काही कार्यकर्त्यांसह शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू असून याबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

दरम्यान, पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एकबोटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तिथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटे यांना १४ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.