माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. काल खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ते उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता एकनाथ खडसे यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत खडसे यांनी

एकनाथ खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट नेगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं होतं. मात्र, आज त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हा आल्याने त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.