महिला दिनानिमित्त पाडळसे प्रा.आ.केंद्रात नारीदिप सन्मान सोहळा संपन्न

0

पाडळसा :  येथे जागतिक महिला दिनानिमित्त  आशा कर्मचारी आणि खान्देश नारीशक्ती गृप यांच्या संयुक्त विद्यमाने रणरागिणी नारीदिप सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे या होत्या.महिलांनी आत्मनिर्भर होण्याबरोबरच आत्मरक्षण देखील स्वताचं केलं पाहिजे असे मत सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कोणी मोठ्या पदाधिकारी नव्हे तर भालोद येथील एक सर्वसामान्य कुटुंबातील श्रीमती वत्सलाबाई वामन नेहेते वय वर्षे ८२ या होत्या.अतिषय प्रतिकूल परिस्थितीत मात करीत समाजात एक आदर्श निर्माण करुन समस्त महिला वर्गाला प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० महिलांना आई जिजाऊ आई सावित्रीच्या रणरागिणी नारीदिप सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याचबरोबर महिला व विद्यार्थीनींच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सौ.निलिमा योगेश ढाके गटप्रवर्तक बामणोद,सौ.अर्चना विनोद सोनवणे गटप्रवर्तक विरोदा,सौ.दिपाली जितेंद्र कोळंबे  गटप्रवर्तक निंभोरा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विषेश परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित सर्व महिलांनी नऊवारी साड्या परिधान करून उपस्थिती लावली होती.पाडळसासह बामणोद,भोरटेक,म्हैसवाडी,विरोदा,अंजाळा,दुसखेडा,कासवा,डोंगरकठोरा,अकलूद,कोसगाव,वनोली,रिधूरी,करंजी,वढोदा, फैजपूर यासह परीसरातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सुत्रसंचालन सौ.निलिमा ढाके यांनी तर आभारप्रदर्शन सौ.अर्चना सोनवणे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.