प्राणायाम व योगासनांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत- महापौर भारती सोनवणे

0

जळगाव (प्रतिनिधी) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निमित्त एचआयव्ही बाधित रुग्ण महिला भगिनींसाठी व बालकांसाठी गृह उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  कार्यक्रमासाठी जळगावच्या प्रथम नागरिक महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. योगेश मुक्तावर, रोटरी क्लब जळगाव वेस्टचे अध्यक्ष डॉ.सुशीलकुमार राणे,  वैशाली कुर्हाडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष  गनी मेमन, मानद सचिव  विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्या डॉ. अपर्णा मकासरे, जाणीव बहूद्देशीय संस्थेच्या  मनीषाताई बागूल, प्रवीण पाटील, शालिनीताई पगारे, कपिल देव बागुल व सहकारी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना  मनीषाताई बागूल म्हणाल्या की एचआयव्ही बाधित रुग्णांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेडक्रॉससारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्व भगिनी आणि बालकांना योग्य ती मदत करणे शक्य होते.  अजून हि अनेक अडचणी एचआयव्हीबाधितांना येत असतात. तरी कृपया शासनाने व महानगरपालिकेने लक्ष सहकार्य करावे अशी अपेक्षा मनीषाताई बागूल यांनी व्यक्त केली.रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन यांनी आपल्या मनोगतात संगितले की, कुणी ही खचून न जाता आलेल्या अडचणीना सामोरे जा. रेडक्रॉस सदैव समाज सेवेचे ब्रीद घेऊन  कार्य करीत असून भविष्यात ही सर्व एचआयव्ही बाधित भगिनींना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तपेढीमार्फत गरजेनुसार योग्य  सहकार्य करण्याचे आश्वासन देत जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. रेडक्रॉसचे सहसचिव श्री राजेश यावलकर यांनी रेडक्रॉसच्या कार्याची माहिती करून देत जाणीव बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

एचआयव्हीबाधितांसाठी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने कार्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली.  रोटरी क्लब जळगाव वेस्टचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे यांनी हि रोटरीच्या माध्यमातून भविष्यात या सर्व भगिनींसाठी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. योगेश मुक्तावर यांनी एचआयव्हीग्रस्त महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  जळगावच्या प्रथम नागरिक, महापौर मा.सौ भारतीताई सोनवणे यांनी सांगितले कि एचआयव्हीग्रस्तांनी  नियमित प्राणायाम व योगासने केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळेल तसेच व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो म्हणून सर्वांनी प्राणायाम व योगासने नक्की करा. माझ्या कार्यकाळात मी नक्कीच आपल्याला सहकार्य करेल. सर्व भगिनींना मान्यवरांच्या हस्ते गृहूपयोगी साहित्य देण्यात आले. कार्यकारिणी सदस्या डॉ. अपर्णा मकासरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.