महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही -वंदनाताई चौधरी

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रसिध्द नृत्यांगणा व लावणी सम्राट सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्या नंतर विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांना केलेल्या बेताल व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर शहरातील मॉंसाहेब जिजाऊ चौक नगरपरीषद जवळ प्रविण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांच्या प्रतिमेस जोडामार आंदोलन करीत” प्रविण दरेकर हाय हाय ” महिलांचा अपमान करून त्यांना घृणास्पद वागणुक देणारे प्रविण दरेकर मुर्दाबाद ” अशा घोषणा देण्यात आल्या .

सुरेखा पुणेकरांचा हा अपमान  नसुन समस्त महिला वर्गाचा हा अपमान आहे . हा अपमान राष्ट्रवादी काँग्रेस कदापी सहन करणार नाही. त्यामुळे महिलांचा अनादर होऊन त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाजपा मधील सुसंस्कारात वाढलेल्या जबाबदार नेत्यांनी असे वक्तव्य करावे हे अशोभनीय असुन त्यांनी बेताल बोलणाऱ्यांना वेळीच आळा घालुन महिलांची जाहीर माफी मागावी . व पुन्हा महिलांच्या बाबतीत असली भाषा वापरणाऱ्यांचे थोबाड महिलांकड्डनच रंगविले जाईल असा सज्जड दम राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ .वंदना चौधरी यांच्या कडुन भरण्यात आला .

त्यावेळी तालुकाध्यक्ष डॉ . प्रशांत पाटील, विधान सभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्षा सुनिता सुर्यवंशी . अॅड .ज्ञानेश्वर बोरसे, पप्पु पाटील, प्रल्हाद बोरसे , प्रभु झाल्टे,रर्विंद्र सुर्यवंशी, विनोद माळी यांच्या सह राष्ट्रवादी महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.