महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

0

खामगांव(गणेश भेरडे)  : द महाराष्ट राज्य केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधी साठी निवडणुक अधिकारी दिलीप कदम यानी निवडणुक निकाल जाहीर केला .अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब तर सचिव पदी अनिल भाऊ नावदंर यासह पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. राज्य केमिस्ट  संघटनेची  कोविड 19 च्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाच्या प्रमाणे आॅनलाईन मिटिंग घेण्यात आली.

 

संघटनेचा निवडणुक कार्यक्रम  यापुर्वी जाहीर करण्यात आला होता निवडणुक अधिकारी म्हणुन दिलीप कदम ,सुनिल छाजेड  यानी कामकाज पाहिले .पत्येक जागेसाठी एकच  अर्ज आल्याने  आजच्या  आयोजित सर्वसाधारण  सभेत नावे जाहीर करण्यात आली.अध्यक्ष जगन्नाथ शिंदे कल्याण ,उपाध्यक्ष मुकुंद दुबे चंदपुर. अरुण बरकसे बीड, सचिव अनिल नावदंर खामगांव  सह सचिव प्रसाद दानवे मुंबई, खजिनदार वैजनाथ जागुष्टे रत्तागिरी,संघटन सचिव मदन पाटिल कोल्हापुर तर पीआरओ पदी अजित पारख याचे नाव जाहीर करण्यात आली.तत्पुर्वी  आजच्पा कार्यकारणी  सभेत आॅनलाईन फार्मसी विरोधात तीव्र  भावना व्यक्त  करण्यात आल्या.

कोविड 19 अंतगत केमिस्टने  केलेल्या  कार्याची दखल शासनाने घेतली पाहीजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. करोना ची लस सर्व केमिस्ट च्या माध्यामातुन वितरीत करण्याबाबत देखिल विचार माडण्यात आले.आॅनलाईन फार्मसी वर तात्काळ प्रतिबंध न आणल्यास भविष्यात वेगळी निती अवलंबण्यात येईल असे जगन्नाथ शिंदे  यानी सांगितले  सचिवांचा  अहवाल गत तीन वर्षीचा लेखाजोखा अनिल नावदंर यांनी माडला आभार अरुण बरकसे यांनी  केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.