महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

0

पुणे: मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 आणि 21 तारखेला कोकणाला रेड ॲलर्ट  अतिवृष्टीचा दिला इशारा आहे. मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. उद्या कोकणात रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं पुढील चार दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, 20 आणि 21 जूनला कोकणाला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार

अनुपम कश्यपी यांनी 20 तारखेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचं सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.