शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर

0

पारोळा प्रतिनिधी |  शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन कृष्णा क्रिटीकल केअर सेंटर येथे शनिवार ता,१९ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असुन मतदार संघासह तालुक्यातील गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि प सदस्य डाँ हर्षल माने यांनी केली आहे.

यावेळी शिबीरात हृदयरोग मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत शिंदे,डाँ अभिषेक फिरके,डाँ आर एस पाटील,स्री रोग तज्ञ डॉ. मनीषा पाटील,डाँ दिपाली माने,अस्थिरोग तज्ञ डॉ. दिनेश पाटील, मानसोपचार तज्ञ डाँ. पंकज संघवी, बालरोग तज्ञ डाँ. भूषण चव्हाण, मुळव्याध भगंदर तज्ञ तथा एम ए जनरल सर्जन डॉ.मनोज पाटील, कान नाक घसा तज्ञ डॉ.प्रियंका शिंदे, भुलरोग अतिदक्षता तज्ञ डॉ. महेश पाटील,शांतीलाल चव्हाण, जनरल फिजिशियन डॉक्टर डॉ. निलेश देसले आदी डॉक्टर्स सर्वरोग निदान शिबिरात मोफत तपासणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एरंडोल -पारोळा मतदार संघातील तसेच पारोळा तालुक्यातील गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि प सदस्य डॉ. हर्षल माने यांनी केले अाहे,

Leave A Reply

Your email address will not be published.