तिवसा येथे पाणीप्रश्न पेटला ; तिवसा शहराला गढूळ व दूषित पाणीपुरवठा शिवसेना आक्रमक

0

अमरावती (प्रतिनिधी) : तिवसा येथे पाण्याची कमतरता नसून सुद्धा शहराला पाण्याच्या समस्या ने ग्रासले असून तिवसा वासियांना 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र तेही अत्यंत दूषित व गढुळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .

येथील नगर पंचायत नागरिकांचे जीवाशी खेळत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी .अन्यथा पाच जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने नगरपंचायतवर  महामोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा उपप्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप गौरखेडे व कुमारी तेजस्वी नाना वानखडे यांचे नेतृत्वात शिवसैनिकांनी मुख्याधिकारी यांना गुरुवारी  निवेदनाद्वारे  दिला आहे .

गेल्या तीन महिन्यापासून तिवसा शहराला बारा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो .यावर्षी पाण्याची कमतरता नसताना तिवसा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे . तीन ते चार दिवसाआड व नियमितपणे सुरू असलेला पाणीपुरवठा बारा ते पंधरा दिवसा आड होत असून तो सुद्धा दूषित व गढूळ होत आहे. नळाला येणाऱ्या अशुद्ध व गढुळ पाणी नमुन्याच्या बाटल्या मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना देऊन हे पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी चांगले आहे का  ?असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला पाणीप्रश्‍न सोबतच मागील दीड वर्षापासून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तिसऱ्या धनादेशाचे अद्याप पर्यंत वाटप करण्यात न आल्यामुळे काहींना अद्याप भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून वरीष्ठांसोबत चर्चा करून त्यांना धनादेश मिळवून देण्यात यावे .तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुल लाभार्थ्यांना मंजुर यादी नुसार त्वरित आदेश देण्यात यावे. अशी मागणी  केली

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा उपप्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप गौरखेडे ,कुमारी तेजस्विनी नाना वानखडे,  माजिनगरसेवक अनिल थुल , दत्ता माळोदे, रमेश वानखडे, विलास खेडकर, गणेश डोळस ,विनोद बाखडे, अजय आमले, अभय वानखडे ,भूषण देशमुख, बाळू देशमुख, अनिकेत वानखडे ,प्रवीण वानखडे, अण्णा पडोळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.