अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

0

अमरावती (प्रतिनिधी) : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहे . हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचविण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी पुनर्निरीक्षण याचिका दाखल केल्याची माहिती आहे. अनुच्छेद 136 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे समजते .

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती .मुंबई हायकोर्टाने त्यावर निकाल देत नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले .खासदार नवनीत राणा यांना हायकोर्टाने दोन लाखाचा दंड देखील सुनावला आहे.

नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे .त्यांनी अनुच्छेद 136 अंतर्गत याचिका दाखल केली आहे .सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.