नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथिल लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध विकास कामाचे भुमिपुजन,उदघाटन, व लोकार्पण  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,

पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात विविध विकास कामाचा शुभारंभ तर काही पुर्ण झालेल्या विकास कामाचे आज वाढदिवसाचे औचित्त साधुन लोकार्पण करण्यात येणार आहे,यात दलित वस्ती अंतर्गत धरणगाव रस्त्यालगतच्या स्मशान भुमी धरगाव माथा पासुन ते दिल्ली दरवाजा पर्यंत चा सिमेट कांक्रीट रस्ता, राजीव गांधी नगर मधील स्रि,व पुरषा साठी सौचालय, धरगाव दरवाज्या जवळील सौचालय, कुभांर वाड्या जवळील मुतारी,कासार गणपती चौक येथिल मुतारी,बालाजी पार्क मधील सौचालय,खांडेकर वाडा येथिल रस्ता,विध्यानगर येथिल बगिचा बोरी काॅलनी रस्ता,डी,डी नगर मधील गार्डन,आदर्श नगर मधील रस्ता या सह इतर विकास कामाचे लोकार्पण तसेच काही भागात विविध विकास कामाचे उदघाटन करुन शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती उपानगराध्यक्ष दिपक अनुष्ठान यांनी दिली.

तसेच वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम म्हणुन सकाळी आठ वाजेपासुन रक्तदान शिबिराचे आयोजन स्टेट बॅंकेच्या वरती करण्यात आले असल्याची माहीती करणदादा मित्र परिवारा कडुन देण्यात आली आहे,या प्रसंगी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा पाटील,चाळिसगाव विधान सभेचे आमदार मंगेश चव्हाण,पाचोरा येथिल युवा नेवृत्व अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.