महाराष्ट्रातील पहिले हर्बल गार्डन होणार जळगावात

0

ना. महाजन यांच्या प्रयत्नांना यश : तहसीलदार व संबधित अधिकार्‍यांतर्फे जागेची पाहणी व माती परीक्षण

जळगाव ,दि.3-
केंद्र शासनाच्या आयुषमान मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले हर्बल गार्डन निर्मिती प्रथमच करण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे.
तहसीलदार व संबधित अधिकार्‍यांतर्फे जागेची पाहणी व माती परीक्षण करण्यात आले.
जिल्ह्यातील विकासात्मक वाटचालीत पर्यटनाला देखील वाव मिळावा साठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे पाठपुरावा केला होता.
पर्यटनाच्या दिशेने वाटचाल
जिल्ह्यात पर्यटन म्हणून वनस्पती उद्यान नावारूपाला येणार आहे.
महाराष्ट्रातील पहिले हर्बल गार्डन जळगावात होणार असून देशभरातील तसेच राज्यभरातील पर्यटक याठिकाणी भेट देऊ शकणार असून उद्योग व्यवसायांना देखील यामुळे चालना मिळणार आहे. माती परीक्षण, वनस्पती, जगभरातील आयुर्वेदिक झाडे यांचा संगम उद्यानात असणार आहे. याचा सर्वात अधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होणार असून शेतकर्‍यांना उत्पादनात लाभ व्हावा यासाठी परीक्षण सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तहसीलदार अमोल निकम,प्रस्थावीत वैद्यकीय महाविद्यालय अधिकारी मिलिंद निकुंभ, डॉ किमोथी, डॉ पुरोसुले , अरविद देशमुख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.