चुलीच्या धुराने अश्रू येणार्‍या डोळ्यांना दिले आनंदाश्रू!

0

गॅस वितरकांचे भिष्म पितामह दिलीप चौबे

यांची दिलखुलास मुलाखत

जळगाव दि. 3-
आई चुलीवर स्वयंपाक करायची तिला होणार्‍या वेदना अनुभवल्या. गावातील गोरगरीब महिलांना चुलीच्या धुरामुळे त्रासाने अश्रू अनावर व्हायचे त्यांच्या छोटाशा झोपडीत गॅस आल्यावर त्यांच्या अश्रूंचे आनंदाश्रू झाले व पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत 43 गावे चुलमुक्त केली. असे प्रतिपादन शहरातील गॅस वितरकांचे भिष्म पितामह दिलीप चौबे यांनी लोकलाईव्हला दिलखुलास मुलाखतीत केले.
अपघाताने या क्षेत्रात आलो
माझे रायपूर, छत्तीसगड येथे पूर्ण शिक्षण झाले आहे. मॅकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर नोकरीनिमित्त नागपुर व विवाहानंतर जळगावात स्थायीक झालो. सासरे सतिश चतुर्वेदी यांच्या आग्रहाखातर या व्यवसायाच्या शिक्षणासाठी पाठविले. तेथील एका गॅस एजन्सीत एक ग्राहक सायकलवर हंडी घेवून आला आणि हंडी मिळण्याचा आग्रह केला तेव्हा वितरकाने दोन दिवस हंडी मिळणार नाही असे सांगितले नंतर त्याला एका बड्याचा फोन आल्यावर हंडी पाठवतो असे त्या वितरकाने सांगितले. या घटनेचा परिणाम होवून मी हे सेवाक्षेत्र मानून या क्षेत्रात आलो. जर्मन स्टॅण्डर्ड कंपनीत काम केल्याने वेळेचे महत्व कळले व मी वक्तशीर झालो.
रिलायन्स इंडस्ट्रिचे महाराष्ट्रात काम
सिलेंडरची तपासणी मॅकेनिकल इंजिनिअरच करु शकतो. मी स्वत: मॅकनिकल इंजिनिअर असल्याने सिलेंडर तपासणीचे काम करतो ही तपासणी स्टॅम्पनुसार रिचेकींग केले जाते. महाराष्ट्रात मी रिलायन्स इंडस्ट्रिचे काम करतो. टेस्टनंतर सिलेंडर भरायला जातात. हा व्यवसाय मौत का कुव्यातील गाडीचालकाच्या कसरतीप्रमाणे होता. तेव्हाच्या काळात 6 वर्ष थांबूनसुद्धा कनेक्शन मिळत नव्हते.
ग्राहकांनी मारलेही व पोटाशीही धरले
सर्वसामान्यांना गॅस ही गरजेची वस्तू आहे. 2004-05 मध्ये गॅसची तीव्र टंचाई होती.सिलेंडर येत नव्हते पर्यायी व्यवसाय सोडण्याची वेळ आली होती. शाहूनगरातील कार्यालय ते नेहरु चौकमागे पर्यंत गॅस कनेक्शन घेण्यास लांबच लांब रांगा लागत होत्या. गैरसमजातून लोकांचा आक्रोश झाला, लोक खवळले. मात्र त्यातील काही जाणकार समजदार ग्राहकांनी माझी बाजू समजून घेत इतरांना सावरले.
दीड लाख लोकांशी संपर्क
माणसाने व्यवहार करताना मी त्या ठिकाणी असतो तर..? असा विचार करावा निष्काम सेवेतून आज माझा दीड लाख लोकांशी संपर्क आहे. त्यामुळे लोक दिलीप चौबेंनंतर चौबेच अशी उपमा देतात. त्यामुळे मला विविध संस्थांकडून आतापर्यंत दहा पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या चांगल्या कामांचा सुगंध किर्ती सर्वदूर पसरते त्यामुळे मी राज्यातील सर्वात जास्त गॅस कनेक्शनधारक वितरक असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनातील वाईट काळ धडा शिकवितो
माझ्या जीवनात मी अनेक उतार-चढाव पाहिले. असाच एक बॅड पॅच माझ्या जीवनात आला. माझी एजन्सी काढून घेण्यात आली होती. माझी उच्च न्यायालयात केस चालू होती. त्यावेळचे आमदार असलेल्या माझ्या काकांकडे मी आमदार निवासला रहायचो. त्यावेळी एक वेळ जेवणाला पैसे नसायचे. मात्र आई-बाबांनी केलेले संस्कार, स्वत:वरचा आत्मविश्वास याने मी उच्च न्यायालयातील केस जिंकून आलो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येतो. त्यावेळी व्यक्ती खचून जातात. जीवनातील वाईट काळ हा एक धडा देवून जातो.
मुस्लिम भगिनीने आणला अजमेरचा प्रसाद
आपण समाजकार्यात कधीच जातधर्माला थारा दिला नाही. माझ्या कार्यालयाबाहेर काही मुस्लिम महिला थांबल्या होत्या. त्यांना विचारले असता फार पूर्वी त्यांच्या अत्यवस्थ मुलाला ओ निगेटीव्ह रक्त मिळत नव्हते. तेव्हा मी माझ्या पत्नीला रक्तदान करण्याास प्रवृत्त करुन मुलाचे प्राण वाचले होते. त्याबाबत ते कुटुंब अजमेरला तीर्थस्थळी गेले होते. तेथून त्यांनी माझ्यासाठी प्रसाद आणला होता. समाजकार्यात मी कधीच भेदभाव केला नाही. स्वत:ही 50 वेळा रक्तदान केलेले आहे. परमेश्वराने दिलेले कर्तव्य पार पाडताना आपल्या परीने शक्य तितकी मदत करतो. त्याचप्रमाणे समाजातील 5 एचआयव्हीग्रस्त मुलांना दत्तक घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी गॅस वितरक असोसिएशनचा प्रमुख असल्याने सिलेंडर आल्यावर ते तपासून घ्या. आलेल्या व्यक्तीकडून रेग्युलेटर लावून तपासून घ्या. स्वयंपाक घरात देवघर नसावे, कारण सिलेंडर लिकीज असेल अन् देवघरात दिवा तेवत असेल तर मोठा अनर्थ घडू शकतो, असा संदेश त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.