महादेवाचे दर्शन करून परतताना काळाचा घाला; अपघातात दोन ठार, आठ जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील कांचननगर परिसरात राहणारे  काही तरुण श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेश येथील  शिरवेल महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते.मात्र  मालवाहू गाडीने दर्शन घेऊन घरी परतत असताना  घाटात अपघात होऊन दुर्देवाने दोन तरुण जागीच ठार झाले असून  आठ जण जखमी झाले आहेत.

श्रावण सोमवार निमित्त कांचननगर भागातील काही तरुण भाविक  मध्यप्रदेशातील शिरवेल महादेव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास घाटात मालवाहू रिक्षा उलटल्याने  दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर  या अपघातात प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६, रा. कांचननगर जळगाव) आणि गोलू बंडू परदेशी (वय २६, रा कांचननगर) हे दोन्ही जण जागीच मृत झाले. तर  अजय सुनिल वाल्हे (वय २१), गणेश रविंद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रविंद्र मोरे (वय २३), पवन रविंद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

रावेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दोघांवर शवविच्छेदन करण्यात आले. दोघांच्या अपघाती मृत्यूने कांचननगर भागात शोककळा पसरली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.