महाजन म्हणाले, खडसे गेल्याने फरक पडणार नाही; मात्र पक्षबांधणी बैठकीला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

0

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून भाजपनं कंबर कसली आहे. भाजपने पक्षबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या असून पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांकडून बैठकीत चाचपणी करण्यात आली.

 

मात्र, भाजपच्या पक्षबांधणीच्या बैठकीला अनेक कार्यकत्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. भाजपला मोठे भगदाड पाडण्याची सुरुवात खडसेंनी केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

त्यातच खडसे गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. जळगावात आमच्याकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरून काढणारे नेते आहेत,असे वक्तव्ये गिरीश महाजन यांनी केलं होत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या ठिकाणी भाजपकडून बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजी मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे ,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे , अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके एवढेच लोक या बैठकीला उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.