शुभम पाटील आय.टी. इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या आमडदे तालुका भडगाव येथील रहिवासी ह. मु. पाचोरा येथील संघवी कॉलनी मधील एस. आर. पाटील उर्फ शांताराम रामचंद्र पाटील आमडदेकर सेवानिवृत्त डेप्युटी मॅनेजर बी. एस. एन. एल .जळगाव यांचा मुलगा शुभम शांताराम पाटील याने आय .टी. इंजीनियरिंग मध्ये नुकतीच पदवी प्राप्त केली.

 

त्यात फर्स्ट रँक इन  गोल्ड मेडलिस्ट झाला असून दहावी व बारावी देखील त्याला गणित या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झालेले आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंगसाठी त्याने पुणे येथील नामांकित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे याठिकाणी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून अभियांत्रिकीचा चौदाव्या पदवीधर दीक्षांत समारंभ नुकताच पुणे या ठिकाणी पार पडला.

 

शुभम  शांताराम पाटील या विद्यार्थ्यास कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. नितीन करमाळकर यांच्या शुभहस्ते त्याचा यथोचित गौरव करून फर्स्ट रँक  इन गोल्ड मेडल देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी बी जी इंजीनियरिंग कॉलेज चे प्रेसिडेंट प्रताप पवार हे देखील उपस्थित होते. त्याच्या ह्या यशात त्याचे वडील एस आर पाटील व आई जयश्री पाटील यांचा देखील सिंहाचा वाटा आहे.

 

त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन  त्याला यासाठी कामात आले. त्याच्या ह्या विशेष प्राविण्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून आमडदे गावाचे सरपंच तथा कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील सह आमडदे गावातील व एस आर पाटील यांच्या बी. एस. एन. एल. विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.