महागाईच्या विरोधात तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तहसील कार्यालय भडगाव येथे पेट्रोल डिझेल गॅस विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडले असल्याने केंद्र सरकारच्या  दरवाढीच्या विरोधात भडगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने व पाचोरा भडगाव विधानसभेचे मा. आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रवादी कार्यालय येथून घोषणा देत तहसील  कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भडगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुल पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, महिला अध्यक्षा रेखा ताई पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे अध्यक्ष अरुण सोनवणे, राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, युवक कार्याध्यक्ष स्वदेश पाटील,  युवक शहराध्यक्ष विवेक पवार, युवकचे उपाध्यक्ष  वडजीचे जगदीश पाटील, जितेंद्र पाटील, युवकचे जिल्हा प्रवक्ते भुषण पाटील, युवक उपाध्यक्ष पितांबर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पाटील कजगावचे शहराध्यक्ष आरिफ मालिक, युवक तालुका उपाध्यक्ष विकी पाटील, अशोक राजपूत, कुणाल पाटील, माजी शहराध्यक्ष रवींद्र महाजन, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील आदी निवेदन देतांना  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.