महाआघाडी सरकारच्या विरोधात 22 रोजी राज्यभर धरणे

0

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नेरुळ (नवी मुंबई) : महाआघाडी सरकारच्या जनहित विरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे 22 फेब्रुवारी रोजी राज्यभरात तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

भारतीय जनता पार्टी च्या राज्य परिषद अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने विश्वासघात केला अस म्हणत आता कार्यकर्त्यांनी रडत बसू नये.महाआघाडी सरकारने सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या चालवलेल्या फसवणुकीच्या विरोधात पक्ष कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर येऊन आंदोलन केले पाहिजे.त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सर्वशक्तीनिशी सहभागी व्हावे.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, महाआघाडी सरकारने शेतकरी, झोपडपट्टी धारक अशा सर्व समाजघटकांची फसवणूक चालविली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जनतेला जागृत करावे.

आम्ही महाआघाडी सरकार पाडणार नाही, महाआघाडी नेच पुन्हा जनमताचा कौल घेण्याची हिम्मत दाखवावी , असे आव्हानही त्यांनी दिले.

या अधिवेशनात महिलांवरील अत्याचाराचा ,  महाआघाडी सरकारकडून  शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीचा निषेध करणारे ठराव संमत करण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. आ. गणेश नाईक, आ.मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन श्री. नड्डा यांचे हस्ते झाले.या अधिवेशनाला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष  खा.डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, शाम जाजू, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.