बोदवड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

बोदवड (प्रतिनिधी) : येथील कर्जबाजारी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रोजी घडली. अंबादास बाळकृष्ण इंगळे (वय ४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबादास इंगळे यांनी १५ रोजी शिसमच्या झाडाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.  सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी कपड्याची तपासणी केली असता त्यात चिल्लर आणेवारी पैसे निघाले परंतु तो दहा वर्षापासून पुण्याला गेला होता तो तिथे कंपनीमध्ये काम करत त्याच्याकडे वैयक्तिक कर्ज असल्याचं नागरिक आपसात बोलत होते. सदर मयताने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती. मयत हे पुणे येथील कंपनीत कामावर होता.त्यांच्या  पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.