ममता बॅनर्जींच्या तृणमूलला धक्का; भाजपला 14 जागांचे ओपनिंग

0

कोलकाता :- तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर सातत्याने केलेल्या तिखट टीकेमुळे पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेची निवडणुक अधिकच लक्षवेधी ठरली होती. मात्र पंतप्रधानांच्या जरा जास्तीच्या प्रचारामुळे भाजपने पश्‍चिम बंगालमध्ये 42 पैकी 14 जागांचे ओपनिंग मिळवले.

राज्य सरकार ताब्यात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसला 19 जगांवर स्वस्थ बसावे लागले. तर अन्य ठिकाणी कॉंग्रेस, डावे आणि अपक्षांनी आपापल्या ताकदीनुसार विजय मिळवले अहेत. कॉंग्रेसला याठिकाणी भाजप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूलच्या विरोधातही लढावे लागले होते. येथे कॉंग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले.

केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आसान्सोल्‌ मतदारसंघातून 31 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या मुनमून सेन यांचा पराभव केला. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर मतदारसंघातून अवघ्या 17 हजार मतांनी विजय मिळवला. विद्यमान खासदार असल्याने त्यांनी आपली जागा कायम राखली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.