मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार : सूत्र

0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची सुत्रांची माहिती आहे. मनसेची बैठक आज पार पडली असून या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढवू असं जाहीर करत तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसे ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुण्यातून निवडणूक लढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे विधानसभेच्या १०० जागा लढवणार आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी मागवली आहे.

मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, औरंगाबादमधून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं कळतं. राज ठाकर यांनी उमेदावारांची यादी मागवली असल्याची माहितीही मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.