मनपाच्या दिव्या खाली अंधार..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहराचे  वैभव असलेल्या  महानगरपालिकेमध्ये लिफ्टची गैरसोय होत असल्यामुळे अनेक नागरिकांना लिफ्ट बंद असल्यामुळे हाल सोसावे लागत आहे. जळगाव मनपामध्ये चार ते पाच लिफ्ट असून एकच वर गर्दी उसळत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच झुंबड उडाली आहे. या बाबतचे चित्र काल रोजी शुक्रवारी दिसून आले.

सध्यातरी कोरोनाचा  संसर्ग जरी आटोक्यात आला असला तरी लिफ्टमध्ये बसतांना सोशल डिस्टन्स पूर्णपणे बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. आज वर सुद्दा लिप्ट बंदच आहे  मनपा प्रशासनाने लवकरात लवकर बाकीच्या लिफ्ट पण सुरू कराव्यात व नागरिकांची सोय करावी,  अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे. याकडे मनपाचे आयुक्त किती लक्ष देतील हे पाहणे औचित्याचे ठरेल.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.