मंदसौर येथे बस पलटल्याने १० प्रवासी ठार

0

३० प्रवासी जखमी ;बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भरणा

इंदूर – मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात रविवारी सकाळी एक बस पलटल्याने झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. अपघातात 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आङे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा अपघात बाईकवर जात असलेल्या तीन तरुणांना वाचवण्याच्या प्रयत्नात झाला. तर पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करून या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले.

पोलिसांच्या मते, हा अपघात शामगड जवळच्या धामनिया दीवान गावाजवळ झाला. बसमध्ये 60 हून अधिक प्रवासी होते. काही बसच्या छतावरही बसलेले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांना सर्वात आधी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लोकांनीच जखमींना रुग्णालयात दाखल केले.

बाइकला वाचवण्याच्या नादात पलटली बस

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बाईकवर स्वार असलेल्या तीन तरुणांना वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. ते वेगात जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करत होते. त्याचवेळी तिघे या बसला धडकले. त्यांना वाचवण्यासाठी ड्रायव्हरने वेगात बस वळवली, त्यात ती पलटी झाली.
दरम्यान अपघाताबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, मृतांना श्रद्धांजली. जखमींना लवकर बरे वाटाले आणि मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी.
अपघातात मारल्या गेलेल्यांमध्ये आतापर्यंत फक्त दोघांची ओळख पटली आहे. त्यात राहुल (30), ईश्वरसिंह (25) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.